Ad will apear here
Next
पर्यावरणपूरक गणपती विसर्जनासाठी ‘व्होडाफोन इको-पाँड्स’
'व्होडाफोन इको-पाँड्स' उपक्रमाच्या  उद्घाटनप्रसंगी  डॉ. शुभांगी बी. उंबरकर, आशिष चंद्रा, सुरेश जगताप
पुणे :   श्री गणेशमूर्तींचे विसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीने करण्यास नागरिकांना साह्य करण्यासाठी आघाडीची दूरसंचार कंपनी व्होडाफोन इंडियाने ‘व्होडाफोन इको-पाँड्स’ हा उपक्रम सुरू केला आहे.

 यासाठी व्होडाफोनच्या महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळाने पुणे महापालिका आणि राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल) यांच्याशी भागीदारी केली आहे ; तसेच  आठ व्होडाफोन स्टोअर्समध्ये व्होडाफोन इको-पाँड्स या तात्पुरत्या पाण्याच्या टाक्या उभारल्या आहेत. पुणेकरांना कोणत्याही एका व्होडाफोन स्टोअरमध्ये श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी जाता येईल. तेथे त्यांना विसर्जनासाठी साह्यही करण्यात येईल. एक प्रमोटर आणि एक लाइफ गार्डही येथे असेल.

जंगली महाराज रस्ता, हिराबाग, वाकडेवाडी, औंध, कर्वे रस्ता, एनआयबीएम रस्ता, कल्याणीनगर आणि खराडी येथील व्होडाफोन स्टोअर्समध्ये व्होडाफोन इको-पाँड्स तयार केली आहेत. याशिवाय भाविकांना ७३९१०००००० या क्रमांकावर संपर्क साधूनही व्होडाफोन इको-पाँड्सचा पत्ता जाणून घेता येईल. याव्यतिरिक्त एक मोबाइल विसर्जन व्हॅनही सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. काही निवडक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये आणि वृद्धाश्रमांत देखील या व्हॅनद्वारे विसर्जनासाठीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. 

व्होडाफोन इको-पाँड्सचे उद्घाटन पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहआयुक्त सुरेश जगताप आणि सीएसआयआर-एनसीएलच्या कॅटॅलिसिस विभागातील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शुभांगी बी. उंबरकर यांच्या हस्ते आणि व्होडाफोनच्या महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळाचे व्यवसाय प्रमुख आशिष चंद्रा यांच्या उपस्थितीत झाले.

 ‘गणेशोत्सव हा पुण्यात साजरा होणारा एक मोठा उत्सव आहे. यंदा १२५ वे वर्ष असल्याने तर तो अधिकच खास आहे. या उत्सवाचा आम्हीही एक भाग असल्याचे आम्ही मानतो. नागरिकांना श्री गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्यासाठी व्होडाफोन इको-पाँड्सच्या माध्यमातून साह्य करण्यात येणार आहे. आपल्या जवळच्या व्होडाफोन इको-पाँडमध्ये श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करावे आणि आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला पर्यावरणपूरक निरोप द्यावा’, असे आवाहन आशिष चंद्रा  यांनी केले.

डॉ. शुभांगी बी. उंबरकर म्हणाल्या, ‘एनसीएलने विकसित केलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जन प्रक्रियेचा प्रसार करण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल सर्वप्रथम मी एनसीएलच्या वतीने व्होडाफोनच्या टीमचे आभार मानते. मातीची गणेशमूर्ती तयार करा किंवा पीओपीची मूर्ती असेल, तर त्याचे विसर्जन करण्यासाठी सीएसआयआर-एनसीएलने विकसित केलेल्या पर्यावरणपूरक विसर्जन प्रक्रियेचा वापर करा’. 

सुरेश जगताप म्हणाले, ‘एनसीएलने विकसित केलेल्या गणेशमूर्ती विसर्जन पद्धतीला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. नागरिक आता पर्यावरणाबाबत अधिक जागरूक असून, सकारात्मक परिणाम असलेल्या नव्या पद्धती ते आजमावून पाहत आहेत. हा नवा उपक्रम सुरू केल्याबद्दल मी व्होडाफोनची प्रशंसा करतो, तसेच पर्यावरणपूरक विसर्जन पद्धतीचा प्रसार करण्यासाठी मदत करत असल्याबद्दल आभारही मानतो.’

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OYZFBF
Similar Posts
बाप्पाला निरोप देण्यासाठी पर्यावरणपूरक ‘व्होडाफोन इको-पाँड’ पुणे : व्होडाफोन आयडिया कंपनीतर्फे याही वर्षी गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी ‘व्होडाफोन इको पाँड्स’चा उपक्रम राबविण्यात येणार आहे. गतवर्षीच्या गणेशोत्सवात ‘व्होडाफोन इको-पाँड्स’ या उपक्रमाला पुणेकरांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता.
‘व्होडाफोन फॅनटॅस्टिक ब्रेक्स’मध्ये पुण्याचे दोघे विजेते पुणे : यंदाच्या क्रिकेट हंगामाच्या काळात व्होडाफोनतर्फे आयोजित करण्यात आलेली राष्ट्रीय ‘व्होडाफोन फॅनटॅस्टिक ब्रेक्स’ स्पर्धा नांदे येथील सिद्धार्थ गुहा व हडपसरमधील ऋषिकेश मोरे या दोघांनी फेसबुकच्या माध्यमातून जिंकली आहे.
‘एआरएआय’ आणि ‘एनसीएल’मध्ये सामंजस्य करार पुणे : इलेक्ट्रिक मोबिलिटी असलेल्या वाहनांची संख्या वाढविणे ही आज काळाची गरज आहे. भविष्यात या इलेक्ट्रिक गाड्यांमधील बॅटरी हा अत्यंत महत्त्वाचा घटक असणार आहे. त्यामुळे वाहन उद्योगासाठी लागणाऱ्या योग्य बॅटरी विकसित करत त्याचे एकत्रित संशोधन गतिमान करण्याच्या उद्देशाने दी ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ
बांधकाम कामगारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे पुणे : बांधकाम साइटवर काम करणाऱ्या कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी महापालिका कार्यक्षेत्रातील बांधकाम कामगारांसाठी मोफत ४५ आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language